Thursday, May 11, 2023

गव्हाच्या रव्याचा उपमा


 


गव्हाच्या रव्याचा उपमा बनवण्यासाठी साहित्य :- 

  • पाव किलो गव्हाचा जाडसर रवा 
  • १ वाटी चणाडाळ 
  • ४ चमचे खोबरे 
  • कोथिंबीर 
  • ४-५ हिरव्या मिरच्या 
  • मीठ 
  • अर्धी वाटी तेल 
  • चवीपुरती साखर 
  • फोडणीचे साहित्य
     
कृती :- 

  • गव्हाचा रवा थोड्या पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावा. डाळ भिजवून ती जाडसर वाटून घ्यावी. 
  • मिरची डाळीबरोबरच मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी. अर्धी वाटी तेलात हिंग, जिरे, हळद, मोहरी घालून फोडणी तयार करावी व त्यात वाटलेली डाळ परतून घ्यावी. 
  • नंतर त्या डाळीत शिजवलेला रवा, मीठ व चिमुटभर साखर घालून मंद्ग्नीवर परतावे. 
  • १५ मिनिटानंतर उपमा तयार होईल. त्यावर कोथिंबीर पसरून खाण्यास द्यावे. ह्यामध्ये मटार, काजू वैगेरे घालून स्वाद वाढवू शकता.  

No comments:

Post a Comment