Wednesday, May 17, 2023

दुधातल्या शेवया


 


दुधातल्या शेवया बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • एक लिटर दुध 
  • १/२ वाटी साखर 
  • ४ ब्रेड स्लाईस क्रम्स 
  • वेलची पूड 
  • सुकामेवा 
कृती :- 

  • प्रथम ब्रेड स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. 
  • आता यामध्ये थोडं थोडं दुध घालून त्याचा एक गोळा तयार करावा. 
  • पंधरा ते वीस मिनिटे झाल्यावर तो गोळा साच्यामध्ये घालून त्याची शेवयी करून घ्यावी. 
  • आता ही शेव कमीत कमी १/२ तास फॅनखाली सुकवून ठेवावी.
     
  • दुध गॅसवर गरम करत ठेवावे. त्यामध्ये साखर, वेलची पूड, थोडा मेवा घालून दुध उकळू द्यावे. 
  • आता दुधामध्ये थोड्या कडक झालेल्या शेवया मोडून घालाव्या. 
  • पाच मिनिटात गॅस बंद करावा. 
  • थोड्या वेळाने थंड करण्यासाठी ही खीर फ्रीजमध्ये ठेवावे. 

No comments:

Post a Comment