Wednesday, June 21, 2023

शेंगदाणा पोळी





 


साहित्य :- 

* सारणासाठी साहित्य :- 

  • शेंगदाणे :- दोन वाटी 
  • गुळ :- एक ते दीड वाटी 
  • इलायची पावडर :- (ऑप्शनल) आवश्यकतेनुसार 
  • तेल-तूप :- पोळ्या भाजण्यासाठी 
  • पुरणपोळी, चपाती बरेचजणांनी बनवली असेल (खाता सगळ्यांनाच येते त्यात काय) तर पुरणपोळीसाठी जशी कणीक लागते अगदी तशीच कणीक मळून घ्यायची साधारण दोन-अडीच वाट्या (हे कम आपापल्या अंदाजाने करा व थोडी जास्तच घ्या उरलीच कणीक तर चपाती करायची.) 

कृती :- 

  • शेंगदाणे निवडून घ्यायचे. (खराब झालेले शेंगदाणे आणि कधी कधी खडे असतात ते काढून टाकायचे.) 
  • आता निवडले शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. (न करपवता.) 
  • शेंगदाणे थंड झाले की त्याची साल / फोलपाटे जे काही असेल ते हाताने चोळून काढून टाकायची. 
  • आता त्याचा मिक्सरमधून बारीक कुत करून एका भांड्यात काढून ठेवायचा आणि गुळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचा (त्या आधी गुळाचे छोटे छोटे खडे करून घ्या म्हणजे मिक्सरमध्ये सहज फिरला जाईल. )
  • शेंगदाण्याचा कूट आणि गुळ एकजीव करा. आता त्यात वेलची घालून मिक्स करा. 
  • कणकेचा चपातीला लागेल एवढा गोळा घेऊन त्याची वाटी करा. त्यात कूट-गुळ मिश्रण भरून त्याच्या कडा बंद करा. (पूर्ण पु.पो.ची प्रोसेस.) आता पोळपाटावर हा गोळा ठेवून लाटण्याने हलकेच पोळी. 
  • मध्यम आचेवर तवा तापत ठेवायचा, त्यावर तेल / तूप लावून (पोळी तव्याला चिकटत नाही) त्यावर पोळी दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची. 








No comments:

Post a Comment