साहित्य :-
- दिड कप ताजा खवलेला नारळ
- पाऊण कप किसलेला गुळ
- १/२ चमचे वेलचीपूड
- १/४ कप गव्हाचे पीठ
- १/४ कप मैदा
- चिमुटभर मीठ
- २ चमचे तेल
- २ चमचे तूप.
- नारळ आणि गूळ एकत्र करून मध्यम आचेवर घट्टसर होईस्तोवर (साधारण १० ते १५ मिनिटे) ढवळावे, वेलचीपूड घालावी. गार झाले कि बंद डब्यात ठेवून २ ते ३ तास फ्रीजमध्ये ठेवावे
- मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करावे. २ चमचे कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे. १ चिमुटभर मीठ घालून ढवळावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. १/२ तास झाकून ठेवावे.
- नारळाच्या मिश्रणाचे दीड इंचाचे गोळे करावे. साधारण ५ ते ६ गोळे होतील. तेवढेच भिजवलेल्या कणकेचे गोळे करावे.
- कणकेच्या लाटीची पुरी लाटावी. मधे नारळाचा गोळा ठेवून पुरीच्या सर्व बाजू एकत्र आणून बंद करावे. थोडा मैदा भुरभुरवून पोळी लाटावी.
- तवा गरम करून तुपावर खरपूस भाजून घ्याव्यात. गॅॅस मध्यम ठेवावा.
- जरा कोमट झाल्या कि खाव्यात. गार झाल्यावरही छान लागतात तसेच ३-४ दिवस टिकतात.
No comments:
Post a Comment