Sunday, May 28, 2023

कोकोनट मोदक




साहित्य :- 

  • १/२ कप खवलेला नारळ 
  • १/४ कप कंडेन्स मिल्क 
  • २ टीस्पून खवा 
  • २ चिमटी वेलची पूड
     
कृती :- 

  • एका मायक्रोव्हेव-सेफ भांड्यात खवा घालून ५० सेकंद मायक्रोव्हेव करावे. भांडे बाहेर काढून काही सेकंद ढवळावे. 
  • आता नारळ घालून ४५ सेकंद मायक्रोव्हेव करावे, असे एकूण ३ वेळा करावे. प्रत्येक ४५ सेकंदानी भांडे मायक्रोव्हेव बाहेर काढून ढवळावे. यामुळे मिश्रण जाळणार नाही.
  • कंडेन्स मिल्क आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे. २ वेळा ३०-३० सेकंद मायक्रोव्हेव करावे. मध्ये एकदा भांडे बाहेर काढून ढवळावे. 
  • मिश्रण घट्टसर झाले की मोल्डमध्ये घालून मोदक बनवावे. 
  • जर मिश्रण चिकटसर राहिले तर मिश्रण २०-३० सेकंद मायक्रोव्हेव करावे. 

No comments:

Post a Comment