Tuesday, May 16, 2023

गाजराची परतून भाजी


 


साहित्य : 

  • ताजी गाजर पाव किलो 
  • तिखट एक चमचा 
  • ओलं खोबर पाव वाटी 
  • मुठभर चिरलेली कोथिंबीर
  • फोडणीचे साहित्य 
  • चवीनुसार मीठ 


कृती : 

  • गाजर स्वच्छ धुवून-पुसून त्याच्या पातळ चकत्या करून अर्धी पळी तेलाच्या फोडणीत घालून मंद आचेवर वाफवून घ्यावीत. 
  • मग यात लाल तिखट व मीठ घालून परत एक मिनिट भाजी परतावी. 
  • वरून खोबरं-कोथिंबीर घालावी. 
  • अशा प्रकारे गाजराची भाजी तयार होईल. 

No comments:

Post a Comment