पनीर रसमलाई बनवण्यासाठी साहित्य :-
- १ लिटर दुध
- ४ वाट्या साखर
- १ कंडेन्सड मिल्कचा डबा
- २ ते ३ कप सायीसकट दुध
- ४-५ वेलदोड्याची पूड
- थोडी केशराची पूड
- १ टीस्पून मैदा.
- १ लिटर दुध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा लिंबूचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दुध नासवून घ्यावे.
- दुध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा. पाणी गळायचे थांबले की काढून घ्या.
- परातीत हे नासलेले दुध व मैदा एकत्र करून खूप मळून घ्या. नंतर त्याचे सुपारी एवढे गोळे करा.
- एका उथळ पातेल्यात २ वाट्या साखरेत ४ वाट्या पाणी घालून कच्चा पाक तयार करा. पाकला उकळी आली की त्यात वरील सोडा.
- गोळे शिजले की चमच्याने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवा, गार होऊ द्या.
- कंडेन्सड मिल्कमध्ये दुध घालून सारखे करा. वेलदोड्याची पूड व केशर घाला. नंतर ह्या दुधात वरील गार झालेले गोळे सोडा.
No comments:
Post a Comment