साहित्य :
- अर्धा किलो बटाटे
- पाव किलो जाड पोहे
- ४-५ ब्रेड स्लाइस
- चवीनुसार मीठ
- आले-मिरची पेस्ट
- तेल
कृती :
- बटाटे उकडून कुस्करून घ्यावे.
- ब्रेड मिक्सरला लावून बारीक चुरा करावा.
- पोहे पाण्यात भिजवून निथळत ठेवावे.
- आता बटाटे, ब्रेडचा चुरा, पोहे ह्यात मीठ आले-लसूण पेस्ट घालून नीट मिक्स करावे.
- लिंबा एवढे गोळे करून तेलात मंद आचेवर तळावे.
- अशा प्रकारे बटाटा पोहे कटलेट तयार होतील.
No comments:
Post a Comment