बंगाली मिठाई साहित्य :-
- १ लिटर दुध
- २ चमचा व्हिनेगर
- २ कप साखर
- १ चमचा वेलची पूड
- २ चमचा मैदा
- २ चमचा मिल्क पावडर
- ६ कप पाणी
- २ चेरी
- ३ थेंब लेमन यलो रंग
- ३ थेंब ऑरेंज रेड रंग
- दुध भांड्यात गरम करा
- दुधाला उकळी आल्यावर व्हिनेगर टाका.व चमच्याने ढवळत रहा.
- दुध फाटल्यावर गाळणीने गाळून घ्या.
- तयार पनीर पाण्याने धुवून रुमालात बांधून ठेवा.
- नंतर पनीरमध्ये मैदा मिक्स करून मळून घ्या.
- पनीरचे २ भाग करा.
- पिवळा व ऑरेंज रंग टाकून मळा.
- पिवळ्या रंगाचे मोठे व चपटे गोळे करा.
- ऑरेंज रंगाचे लहान व चपटे गोळे करा.
- दोन्ही गोळे वेगवेगळ्या साखरेच्या पाकात ५ मि. साखरेच्या पाकात फास्ट गॅसवर तळा.
- नंतर १५ मि. मंद गॅसवर झाकून उकळावे.
- मिल्क पावडर थोड्या पाण्यात घट्ट भिजवून लहान गोळे करा.
- पनीरचे मोठे गोळे काढून त्याच्यावर लहान गोळे ठेवा.
- लहान गोळ्यांवर मिल्क पावडरचे गोळे ठेवा.
- साईडला चेरीच्या कापांनी डेकोरेशन करा.
No comments:
Post a Comment