Wednesday, May 10, 2023

चविष्ट व झटपट दही भेंडी





साहित्य :- 

  •  भेंडी पाव किलो 
  • घट्ट दही दोन वाट्या 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी 
  • धन्या-जीऱ्याची पूड तीन-चार चमचे 
  • मीठ, तिखट आवडत असल्यास 
  • तेल तीन मोठे चमचे 
  • फोडणीच साहित्य. 


कृती :- 

  • भेंडी व्यवस्थित धुवून पुसून घ्यावी. भेंडी जास्त मोठी असल्यास दोन तुकडे करावेत. लहान असल्यास देठ आणि टोकाकडील भाग काढून टाकावा. 
  • भेंडीला उभी चीर देऊन त्यामध्ये धन्या-जीऱ्याची पूड, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आवडत असल्यास तिखट यांच मिश्रण भरावं. 
  • पसरट भांड्यात तीन चमचे तेलावर हिंगाची फोडणी करावी. फोडणीत हळद न घातल्यास भाजीची रंगसंगती छान दिसते.                              
      अशा प्रकारे चविष्ट व झटपट दही भेंडी तयार आहे. 

No comments:

Post a Comment