Thursday, May 18, 2023

आंबा खसखस सरबत


 


आंबा खसखस सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-

  • १/२ कप खसखस 
  • दोन पिकलेल्या आंब्याचा गर 
  • २ कप पाणी 
  • २ मोठे चमचे साखर 
  • बर्फ 
कृती :- 

  • प्रथम खसखस भिजत ठेवा. 
  • ती फुलल्यावर पाण्यासकट मिक्सरमध्ये फिरवून घ्या व गाळून घ्या.
  • आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. 
  • त्यात तयार केलेले खसखशीचे दुध, साखर टाकून मिक्सरमध्ये एकजीव करा. 
  • ग्लासमध्ये बर्फ टाकून थंडगार सरबत प्यायला द्या. 

No comments:

Post a Comment