Sunday, May 14, 2023

खारीक-खोबरे लाडू


 

आज आपण खारीक - खोबरे लाडू बनवण्यासाठी साहित्य :- 

  • खारीक 
  • खोबरे 
  • खजूर 
  • काजू 
  • बदाम 
  • चारोळे 
  • वेलची पावडर
     
कृती :- 

  • सर्वात आधी खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
     
  • नंतर खारीक मधील बिया काढून ते पण मिक्सरमध्ये बारीक करा शेवटी खजूर मधील बिया काढून ते ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. 
  • हे सर्व एका बाउलमध्ये घेऊन छान मिक्स करा. 
  • आता यात काजू, बदाम, चारोळे, आवडत असल्यास वेलची पावडर घाला व छान मळून याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यावे. 
  • प्रमाण आपल्या अंदाजाने घ्यावे. यात खसखस व खडीसाखर पण वापरू शकता. 

No comments:

Post a Comment