Thursday, May 25, 2023

मसाला आम्लेट


 


साहित्य :- 

  • २ अंडी 
  • १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला 
  • १ लहान टोमॅॅटो बारीक चिरलेला 
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
  • मीठ 
  • अर्धा लहान चमचा गरम मसाला 
  • चिमुटभर कडीपत्ता 
  • अर्धा लहान चमचा जिरेपूड 
  • १ लहान तेल 
कृती :-

  • एका भांड्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून चांगले एकत्र करा. 
  • नंतर त्यात गरम मसाला, कडीपत्तापूड आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या.
     
  • मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून त्यात तेल गरम करून त्यावर जिरेपूड घालून काही सेकंदासाठी परतवा. 
  • नंतर त्यावर अंड्याचे मिश्रण घालून मंद आचेवर दोन्ही बाजूने हलके तपकिरी रंगाचे होईपर्यंत शिजवून घ्या.
  • गरमागरम मसाला आम्लेट ब्रेड व सॉससोबत सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment