Wednesday, May 17, 2023

वरईची गोड खीर


 

आज आपण वरईची गोड खीर बनवणार आहोत.
 

साहित्य :- 

  • वरई अर्धी वाटी 
  • दोन मोठे पेले दुध 
  • साखर 
  • साजूक तूप 
  • वेलची पूड 
  • सुका मेवा 
कृती :- 

  • वरई आधीच निवडून धुऊन सावलीत वाळवून घ्या. पातेल्यात तूप गरम करा. 
  • त्यात वरई लालसर भाजून घ्या. दुधात चवीनुसार साखर टाकून मंदाग्नीवर उकळत ठेवा. दुध ढवळून घ्या.
     
  • दुधाला उकळी आली की आच मंद आचेवर शिजत ठेवा. गरज पडली तर पुन्हा थोडे दुध घाला. 
  • शिजत आल्यावर वेलची पूड घाला. ढवळा. सुका मेवा घाला. भांडे खाली उतरा. 
  • थोडावेळ झाकून ठेवा. मग खायला द्या. 

No comments:

Post a Comment