सीताफळ मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
- ५ मोठी सीताफळे, पूर्ण पिकलेली
- थंड दुध ( साधारण दीड ते दोन कप )
- ४ टीस्पून साखर
- १/२ कप वॅॅनिला आईसक्रिम
- ४ सीताफळाच्या आतील गर काढावा. बिया काढून टाकाव्यात. उरलेल्या एका सीताफळाचा गर कढून वेगळ्या वाडग्यात ठेवावा. हा गर मिक्सरमध्ये वाटू नये.
- जर सीताफळांंचा १ कप गर निघाला तर दीड ते दोन कप दुध आणि ४ चमचे साखर घालून मिक्सरमध्ये ब्लेंड करावे.
- नंतर वॅॅनिला आईसक्रिम घालून परत मिक्सरमध्ये फिरवावे. यामुळे मिल्कशेकला थोडा दाटपणा येईल.
- सर्व्ह करताना बाजूला काढलेला सीताफळाचा गर मिक्स करावा.
- लगेच सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment