साहित्य :
- २ वाट्या गाजराचा कीस
- १५-२० बिनबियांची सीडलेस द्राक्षे
- १ चमचा खसखस
- १ चमचा मीठ
- अर्धा चमचा साखर
- पाव चमचा लाल तिखट
- १ वाटी मेयोनेझ किंवा १ वाटी घरचा चक्का
- अर्धी वाटी सायीचे दही
- द्राक्षे धुवून अर्धी अर्धी चिरावीत.
- सर्व जिन्नस एकत्र करावेत व चार तास कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवावी.
- शक्यतोवर पांढऱ्या भांड्यात किंवा केळीच्या पानावर ठेवून टेबलावर न्यावी.
- अशा प्रकारे गाजर द्राक्षे कोशिंबीर तयार होईल.

No comments:
Post a Comment