साहित्य :
- २ वाट्या गोड दही
- १ वाटी दुधी भोपळ्याचा कीस
- १ चमचा मीठ
- अर्धा चमचा गरम मसाला
- २ चमचे कोथिंबीर
- पाव चमचा लाल तिखट
कृती :
- दुधी किसून वाफवून घ्यावा. जिरे भाजून पूड करावी.
- कीस गार झाला की दही पाणी न घालता घुसळावे.
- त्यात मीठ व भाजून कुटलेली जीऱ्याची पूड घालावी.
- ढवळून वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे.
- गरम मसाला, तिखट व कोथिंबीर वरून घालून सजवावे.
- फ्रीजमध्ये गार करून ठेवल्यास जास्त चांगले लागते.
- अशा प्रकारे दुधी भोपळ्याचे रायते तयार होईल.
.jpg)
No comments:
Post a Comment