साहित्य :-
- ज्वारीचे पीठ - ४ मोठे चमचे
- मध्यम आकाराचा दुधी भोपळा किसून - दुध्या कोवळा असावा.
- नख लावल्यावर तेल आले तर कोवळा आहे असे समजावे. (इथे ह्यापैकी कुठलीही भाजी (बारीक चिरून, किसून) वापरू शकता. उदा : टोमॅॅटो, पत्ताकोबी, काकडी, पालक, मेथी, लाल माठ, बीट, गाजर, मुळा.
- आवडीनुसार मिश्र भाज्या सुध्दा वापरता येतील. उरलेली शेळी भाजी असेल तरीही चालते. बारीक वाटून घ्यावी मात्र.
- कोथिंबीर बारीक चिरून
- लाल तिखट पूड किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरून - चवीनुसार
- मीठ - चवीनुसार
- जिरे - आवडीनुसार
- ओवा - चिमुटभर
- तीळ - चिमुटभर
- धण्याची पूड - चिमुटभर
- हळद - चिमुटभर
- तेल - थोडेसे
- कुठला तुमचा खास मसाला असेल तर तोही टाका चिमुटभर, नाहीतर फार विचार न करता चिमुटभर गरम मसाला घ्या.
- पाणी.
- भाकरी थापता येत असेल तर हे धपाटे पण जमतील. साधारण कृती भाकरीसारखी आहे.
- दुधाचा कीस थोडेसे तेल टाकून परतून घ्यावा. हे करणे गरजेचे आहे.
- कारण कोवळ्या भाजीला पाणी सुटते आणि धपाटे थापणे अवघड होऊन बसते.
- वाफ आल्यानंतर ज्वारीच्या पिठात तो कीस आणि इतर जिन्नस टाकून व्यवस्थित एकत्र करा.
- आता हे पीठ छान मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकत भाकरीसाठी भिजवतो. त्याप्रमाणे भिजवा.
- भाकरी थापतो तसे थापायचे आहे. त्यानुसार Consistency असू द्या.
- ह्या स्टेपला तेल शक्यतो वापरू नये, कोमट पाणी वापरा.
- गोळा झाल्यानंतर त्याची कोरड्या ज्वारीच्या पिठावर घोळवून भाकरी थापतो तसे थापून घ्या.
- जाड बुडाच्या तव्यावर (लोखंडी असल्यास उत्तम, नॉनस्टिक पण चालेल) थापलेला धपाटा टाकून दोन्ही बाजूनी भाजून घ्या. (आधी मोठी आच ठेवा नंतर adjust करू शकता.)
- धपाटा उलटसुलट करण्यासाठी सराटा / उलथन हाताशी हवं. धपाटा भाजत असताना कडेने तेल सोडा.
.jpg)
No comments:
Post a Comment