Tuesday, May 16, 2023

पनीर लॉलीपॉप


 





साहित्य :- 

  • १ कप पनीर, किसलेले 
  • २ मध्यम बटाटे, उकडलेले 
  • दिड चमचे आले, किसलेले 
  • १ चमचा लसूण पेस्ट 
  • २ चमचा लाईट सोया सॉस 
  • १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून 
  • १ चमचा कॉर्न स्टार्च 
  • १/२ चमचा पांढरी मिरपूड 
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून 
  • १/४ कप कांदा, बारीक चिरून 
  • ३ चमचा मैदा 
  • चवीपुरते मीठ 
  • तळण्यासाठी तेल 
  • ८ ते १० लाकडी स्टिकस किंवा बेबी कॉर्न. 


कृती :- 

  • बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नयेत. 
  • मैदा सोडून सर्व साहित्य एकत्र करून छान मळून घ्यावे. मध्यम आकाराचे ८ ते ९ गोळे बनवावे. 
  • १ गोळा घेऊन तो नीट दाबून घट्ट करावा व त्यात लाकडी स्टिक एका बाजूने घालावी. मुठीने नीट आवळून नीट बांधून घ्यावा, जेणेकरून तेलात सोडल्यावर गोळा सुटणार नाही. अशाप्रकारे सर्व लॉलीपॉप बनवून घ्यावे. 
  • तयार लॉलीपॉप कोरड्या मैद्यामध्ये घोळवून घ्यावे. किंचित हलवून जास्तीचा मैदा काढून टाकावा. 
  • पुरेसे तेल तापवून आच मध्यम करावी आणि सर्व लॉलीपॉप तळून घ्यावे. तळताना मध्येमध्ये लॉलीपॉप झाऱ्याने फिरवावेत, म्हणजे सगळीकडे नीट तळले जातील. 
      गरमागरम लॉलीपॉप शेझवान सॉस किंवा टोमाटो केचप बरोबर सर्व्ह करावेत. 

 

No comments:

Post a Comment