Saturday, May 13, 2023

खवा केक


 

आज आपण खव्यापासून केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
 

साहित्य :- 

  • २०० ग्रॅम मैदा 
  • १२५ ग्रॅम लोणी 
  • १५० ग्रॅम साखर 
  • ५० ग्रॅम काजूचा चुरा 
  • १०० ग्रॅम मावा 
  • तीन अंडी 
  • १ टीस्पून बेकिंग सोडा 
  • ४ टीस्पून दुध 
  • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स 
कृती :- 

  • मैदा-बेकिंग पाव एकत्र करून चालून घ्यावे. 
  • लोणी-साखर एकत्र करून फेटावे. कुस्करलेला खवा थोडा - थोडा घालून मिक्स करावा.
     
  • अंडी वेगळी फोडून त्यात घालावी. इसेन्स-काजूचा चुरा घालून थोडे-थोडे करून मैदा मिक्स करावा. दुध मिक्स करावे. 
  • केक टीनला ग्रीस करून मिश्रण ओतून १८० डिग्रीवर ओव्हनमध्ये ३५ ते ४० मिनिटे बेक करावे. 

No comments:

Post a Comment