Wednesday, May 17, 2023

बेरीच्या वड्या


 


बेरीच्या वड्या बनवण्यासाठी साहित्य :- 

  • १/४ कप बेरी 
  • १/४ कप साखर 
  • १/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 
  • १/४ टीस्पून वेलची पूड 
  • साखर बुडेल इतपत पाणी 
कृती :- 

  • बेरी हाताने मोडून घ्यावी. शेंगदाण्याचा कूट तयार ठेवावा. 
  • जाड पातेल्यात साखर घालून ती बुडेल इतपत पाणी घालावे. उकळवून साखर विरघळली की आच मंद करावी. ढवळत राहावे. पक्का पाक करावा ( टीप १ ). त्यात बेरी, वेलचीपूड आणि शेंगदाणा कूट घालावा. मिक्स करून घ्यावे.
     
  • मंद-आचेवर २-४ मिनिटे तळापासून ढवळावे. १/२ चमचा मिश्रण ताटलीत काढावे. फुंकर मारून थोडे गार करावे. बोटांना थोडे तूप लावून त्याचा गोळा करावा. जर मउ गोळी झाली तर आच बंद करून तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण काढून थापावे. 
  • मिश्रण थोडे आळले की वड्या पाडाव्यात. 

No comments:

Post a Comment