Wednesday, May 17, 2023

हॉटेललाही लाजवेल अशा चवीचा पनीर टिक्का मसाला |





साहित्य :- 

  • फ्रेश पनीर २०० ग्रॅम 
  • कांदे दोन मोठे 
  • टोमॅॅटो तीन 
  • सिमला मिरच्या दोन बेसन पीठ एक मोठा चमचा 
  • फ्रेश दही अर्धी वाटी (फार आंबट नको) 
  • आलं, लसूण पेस्ट दोन चमचे 
  • हिंग 
  • हळद 
  • धने-जिरे पावडर दोन चमचे 
  • लाल तिखट (काश्मिरी)
  • कोथिंबीर 
  • एक लिंबाचा रस 
  • कसुरी मेथी एक चमचा 
  • किचन किंग मसाला एक चमचा 
  •  गरम मसाला एक लहान चमचा 
  • मीठ 
  • तेल 
  • पाणी दोन वाट्या 


कृती :- 
  • पहिल्यांदा पनीरचे चौकोनी क्यूब करून घ्यावे. 
  • आता एका बाऊलमध्ये पनीरवर, सिमला मिरचीचे चौकोनी काप, आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, एक लहान चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, एक चमचा धने जिरे पावडर चवी पुरते मीठ आणि लिंबाचा रस आणि चार मोठे चमचे दही एकत्र करून मॅॅरीनेट करा. 
  • हे पनीर फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवून द्या. 
  • आता पॅॅनमध्ये चार चमचे तेल घेऊन हे सर्व मिश्रण फ्राय करून घ्या. साधारण तीन ते चार मिनिटात मिश्रण शिजवून तयार होते. यात कुठेही पाणी वापरू नका.    









No comments:

Post a Comment