Tuesday, May 16, 2023

वांग्याचे लोणचे


 



साहित्य :- 

  • ७५० ग्रॅॅम लहान गोल वांगी 
  • १० लसूण पाकळ्या 
  • २ इंच आले, १५ लाल मिरच्या 
  • ११५ मिली व्हीनीगर 
  • ५ चमचे मोहरीची डाळ 
  • १ चमचा हळद, १२५ ग्रॅॅम गूळ
  • ६ मोठे वेलदोडे, १ इंच दालचिनी 
  • ४ लवंगा, १० मिऱ्याचे दाणे 
  • ६ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी 
  • ५ चमचे मीठ. 


कृती :- 

  • आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हीनीगरमध्ये बारीक वाटाव्या. 
  • गूळ व्हीनीगरमध्ये विरघळून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे. 
  • कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी. 
  • त्यात वांग्याचे काप घालून हलक्या हाताने पातेलीत घालून अवसडावे. वांगी मंदाग्नीवर शिजू द्यावीत.
  • एकीकडे वेलची, लवंगा, दालचिनी व मिरी यांची बारीक पूड करावी. वांगी मधूनच एकदोनदा झाऱ्याने अलगद ढवळावीत. 
  • वांगी शिजली की गूळाचे मिश्रण घालावे. दाटसर रस होईपर्यंत शिजवावे. नंतर लवंग-दालचिनी इत्यादीची पूड घालावी. 
  • मोहरीची डाळ व मीठ घालावे. खाली उतरवून लोणचे गार होऊ द्यावे. नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. 
  • आठदहा दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. 

No comments:

Post a Comment