Saturday, May 27, 2023

बडीशेप सरबत





साहित्य :- 

  • १ वाटी कच्ची बडीशेप 
  • २ वाट्या साखर 
  • चवीपुरते मीठ 
  • आवश्यकतेनुसार पाणी 
  • बर्फ 
कृती :- 

  • बडीशेप १ वाटीभर पाण्यात २ तास भिजत ठेवावी. 
  • तोपर्यंत २ वाटी पाण्यात साखर विरघळून घ्यावी.
  • बडीशेप पाण्यासकट मिक्सरमधून वाटून घ्यावी.
  • त्यानंतर ती गाळून घ्यावी.
  • मग साखरेच्या पाण्यात मिक्स करावे.
  • सर्व्ह करताना १ भाग मिश्रणात ४ भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून प्यायला द्यावे. 

No comments:

Post a Comment