Sunday, May 28, 2023

दाल पालक


 


साहित्य :- 

  • पालक 
  • तूरडाळ 
  • मुगडाळ 
  • लसूण 
  • तिखट मीठ फोडणी साहित्य 
  • ( वरून फोडणीसाठी-लाल मिरची )
कृती :- 

  • सर्वप्रथम दोन वाट्या पालक धुवून चिरून घ्यावा. तूर डाळ वा मुग डाळ पाउण वाटी डाळ शिजवून घ्यावी. नंतर पालक उकळून घ्यावा.
     
  • नंतर डाळ रवीने पालक-डाळ एकत्र करावी. पालकाचे पाणी फेकू नये ते मिश्रणात कालवावे. ताटल्यात वा वाडग्यात मिश्रण ठेवावे.
  • कढई गॅसवर ठेवावी. फोडणीपुरते तेल टाकावे. तेल थोडेसे गरम होताच सोललेल्या लसणाच्या ( ८/१० ) पाकळ्या टाकाव्यात. 
  • लसूण पाकळ्या लालसर होताच पालक-डाळ मिश्रण त्यात टाकावे. तत्पुर्त्वी चवीनुसार तिखट टाकावे.
  • नंतर एकदा चमच्याने सारखे करत असताना चवीनुसार मीठ टाकावे. एक उकळी आल्यावर गॅॅस बंद करावा. 

No comments:

Post a Comment