साहित्य :
- २ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
- १ चमचा साजूक तूप
- १/२ चमचे जिरे
- ३-४ हिरव्या मिरच्या
- २ चमचे शेंगदाण्याचा कूट
- १ चमचा लिंबाचा रस
- १/२ ते १ चमचा साखर
- चवीपुरते मीठ
कृती :
- बटाटे शिजवून घ्यावेत. बटाटे सोलून त्याच्या मध्यम फोडी कराव्यात.
- कढईत १ चमचा तूप गरम करावे. त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्या घालाव्यात.
- यात बटाट्याच्या फोडी घालून मध्यम आचेवर परतावे. चवीपुरते मीठ आणि साखर घालावी, दाण्याचा कूट घालावा. झाकण ठेवून वाफ काढावी.
- २-३ मिनिटांनंतर त्यात लिंबू रस घालून मिक्स करावे.
- अशा प्रकारे उपवासाची बटाटा भाजी तयार होईल.
.jpg)
No comments:
Post a Comment