साहित्य :
- उकडून घेतलेले बटाटे मध्यम आकाराचे चार
- दीड वाटी उपवासाची भाजणी
- राजगिरी व शिंगाडा पीठ प्रत्येकी एक चहाचा चमचा
- दानेकुट कप कप
- दही मोठया तीन वाट्या
- हिरव्या मिरच्या २/३
- जिरे एक चिमुट
- आले वाटण एक चहाचा चमचा
- तिखट
- मीठ
- कोथिंबीर
- तूप
कृती :
- एका परातीत उकडून साले काढलेले बटाटे, दाणे कूट, सर्व पीठे, तिखट , मीठ घ्या.
- सर्व पदार्थ एकजीव मळून घ्या. या मिश्रणाचे लाडूच्या आकाराचे लहानसर गोळे करा.
- कढई तूप गरम करा. हे गोळे लालसर रंगावर तळून घ्या. नंतर एका रुंद तोंडाच्या भांड्यात किंवा पसरट बाऊलमध्ये दही घ्या.
- त्यात मिरची, आले वाटण, मीठ घाला. दही तसेच पाणी न टाकता रवीने घुसळून घ्या.
- यात तळलेले गोळे टाका. वरून चिरलेली कोथिंबीर पेरा आवडत असेल तर काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा.
- अशा प्रकारे उपवासाचा दहीवडा तयार होईल.
.jpg)
No comments:
Post a Comment