गव्हाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
- पाव किलो गव्हाचा जाडसर रवा
- पाव किलो गुळ
- पाव लिटर दुध
- पाव तुकडा जायफळ
- २ चमचे खसखस
- ४ वेलदोडे
- २ चमचे बदाम पिस्त्याचे काप
- अर्धी वाटी खवलेला नारळ
- गव्हाचा रवा अर्धा लिटर पाणी घालून कुकरमध्ये ३ शिट्या होईपर्यंत शिजवा.
- गार झाल्यावर त्यात गुळ, खोबरे, वेलचीपूड, खसखस पूड, जायफळ पूड घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे.
- गुळ रव्यात मिसळेपर्यंत म्हणजे साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवल्यानंतर हे मिश्रण खाली उतरवून त्यात दुध घालावे.
- डेकोरेशनसाठी वरून बदाम पिस्त्याचे काप पसरावेत.
No comments:
Post a Comment