Saturday, May 27, 2023

जांभळाचे सरबत


 


 


साहित्य :-

  • १५ ते १८ मोठी पूर्ण पिकलेली जांभळे 
  • १ चमचा लिंबाचा रस 
  • साखर मीठ 
कृती :- 

  • सर्व जांभळ स्वच्छ धुवून घ्या. ती धुतलेली एका पातेल्यात घ्यावीत. 
  • अगदी थोडेसे पाणी घालावे. जांभळे कुस्करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. 
  • मध्यम आचेवर जांभळे ४ ते ५ मिनिटे शिजवावीत. यामुळे रंग थोडा गडद होईल.
     
  • नंतर थंड होऊ द्यावे. मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गाळून त्यातील रस काढून घ्यावा.
  • जांभळाचा रस जितका असेल त्याच्या दुप्पट साखर एका पातेल्यात घ्यावी. 
  • साखर भिजेल इतके पाणी घेऊन त्याचा पाक करायला घ्यावा. गोळीबंद पाक करावा. 
  • पाकात लिंबाचा रस घालावा. पाक थोडा निवू द्यावा. नंतर त्यात जांभळाचा रस घालून मिक्स करावे. 
  • गरजेइतके पाणी घालून थोडे मीठ घालावे. गार सर्व्ह करावे.  

No comments:

Post a Comment