Tuesday, May 16, 2023

ईडली बर्गर




 
साहित्य :- 

१) तांदूळ 

२) उडदाची डाळ 

३) मोडाचे मुग 

४) बटाटा 

५) शिमला मिरची 

६) कोभी 

७) गाजर 

८) टोमॅॅटो 

९) कांदा 

१०) कोथिंबीर 

११) हिरवी मिरची 

१२) आले, लसूण 

१३) धणे पावडर 

१४) चिली फ्लेक्स 

१५) मीठ. 



कृती :- 

१)तांदूळ, उडीद, मोडाचे मुग मीठ टाकून एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

२) आता ईडली भांड्यामध्ये मिश्रण ओतून १५ मिनिटे शिजवून घ्या. 

३) शिजवून थंड करून त्याच्या वाटीच्या सहाय्याने गोल आकार करा. 

४) बटाटा उकडून घ्या, त्यात चिरून घेतलेली शिमला मिरची, कोभी, गाजर, टोमॅॅटो, कांदा, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, मीठ, धणे पावडर चिली फ्लेक्स टाकून स्मॅॅश करा. 

५) गोल टिक्की तयार करा. 

६) आता पॅॅनवर थोड्याश्या तेलात फ्राय करून घ्या. 

७) हिरवी चटणी हिरवी मिरची, आलं लसूण कोथिंबीर मीठ एकत्र वाटून घ्या. 

८) आत गोल ईडली घेवन त्यावर हिरवी चटणी पसरवा त्यावर बटाटा टिक्की ठेवून दुसरी ईडली ठेवा. 

९) पॅॅन वर गरम करून खायला घ्या ग्रील वर ईडली ग्रील करू शकता.   

No comments:

Post a Comment