साहित्य :
- स्लाईस ब्रेड
- १ नारळ
- १ १/२ कप साखर
- ७-८ वेलदोडे
- १/२ चमचा रोज इसेन्स
- थोडासा बेदाणा
कृती :
- नारळ खवून साखर घालून त्याचे सर्न तयार करून घ्यावे व साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे.
- त्यात वेलची पूड,बेदाणा व रोझ इसेन्स घालून गार होऊ द्यावे.
- ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाकाव्यात. नंतर एकेक स्लाईस पाण्यात टाकून हाताने दाबून पाणी काढून टाकावे.
- नंतर वरील सारण १ चमचा घेऊन ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून हाताने सर्व कडा जवळ आणून कचोरीसारखा गोल आकार द्यावा.
- अशा सर्व कचोरी तयार करून ताटात ठेवाव्यात व अगदी आयत्या वेळी तळाव्यात.
- अशा प्रकारे ब्रेडची कचोरी तयार होईल.
No comments:
Post a Comment