साहित्य :
- १ वाटी तांदूळ
- १ वाटी पाणी
- १ वाटी साखर
- १/२ लिटर दूध
- काजू बदाम
- १ चमचा विलायची
- ४ चमचे तूप
- चिमुटभर मीठ
- चारोळे किशमिश
- १ वाटी ओल्या नारळाचा कीस
कृती :
- तांदूळ धुवून एक तास भिजवून व बारीक वाटून घ्यावे.
- एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे त्यात चमचाभर तूप टाकावे. तूप विरघळल्यावर त्यात बारीक केलेले तांदूळ घालावे.
- तांदूळ घातल्यावर पाणी सारखे हलवावे म्हणजे तांदूळ शिजत आल्यावर गोळे होणार नाही व खाली लागणार ही नाही.
- तांदूळ पेस्ट शिजल्यावर त्यात दूध घालून हलवून घ्या.
- दूध घातल्यावर उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर तय्त काजू, बदाम, चारोळे, किशमिश, साखर, नारळाचा कीस, विलायची पूड घालावी. सर्व चांगल्याप्रकारे हलवून घ्या.
- एक उकळी आल्यावर त्यात तूप घालावे व चिमुटभर मीठ घालून मंद आचेवर ठेवावे. गॅॅस बंद करून खीर एका वाटीत घेऊन गरमागरम खाण्यासाठी तयार.
- अशा प्रकारे तांदळाची खीर तयार होईल.
.jpg)
No comments:
Post a Comment