Wednesday, May 17, 2023

कांचीपुरम इडली


 


साहित्य :- 

  • २ वाट्या उकडा तांदूळ 
  • १ वाटी उडीद डाळ 
  • अर्धी वाटी चणा डाळ 
  • पाव चमचा हिंग 
  • १ चमचा काळी मिरी 
  • १ चमचा जिरे 
  • थोडे आले किसून 
  • थोडा कढीलिंब 
  • थोडे काजूचे तुकडे 
  • चवीनुसार मीठ
     
कृती :- 
  • तांदूळ उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. 
  • जिरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला. 
  • थोडे तेल गरम करून काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला. 
  • आले किसून टाकून पीठ खूप फेटावे. 
  • पीठ फेटून ईडली स्टँँडवर इडल्या वाफवून घ्याव्यात. 
                    चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात. 

No comments:

Post a Comment