Wednesday, May 17, 2023

पोह्याचे लाडू


 

आज आपण पोह्याचे लाडू कसे बनवतात ते पाहणार आहोत.
 

साहित्य :- 

  • १ वाटी जाड पोहे 
  • १/२ वाटी बेसन 
  • १/२ वाटी शेंगदाण्याचा कुट 
  • १/२ वाटी गुळ 
  • २ टेबलस्पून सुकामेव्याची पावडर 
  • १ टीस्पून वेलचीपूड 
  • ३-४ टेबलस्पून साजूक तूप 
कृती :- 

  • एका पॅनमध्ये मंद आचेवर पोहे रंग न बदलता भाजून घ्या. 
  • भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून गार करा. 
  • गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी.
     
  • त्याच पॅनमध्ये २ टेबलस्पून तूप गरम करून बेसन हलके-गुलाबी रंगावर भाजावे. 
  • बेसन चांगले भाजले की छान सुवास येईल. 
  • एका बाउलमध्ये पोह्यांची पूड, बेसन, दाण्याचा कुट, गुळ, सुकामेव्याची पावडर व वेलचीपूड एकत्र करावे. 
  • त्यात उरलेले तूप घालून चांगले मिक्स करून घ्यावे. 
  • मिश्रणातले थोडे मिश्रण घेऊन घट्ट लाडू बांधावे. 
  • पोह्यांचे लाडू खाण्यास तयार आहे.  


No comments:

Post a Comment