Thursday, May 18, 2023

कणकेचा केक


 


कणकेचा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • १ वाटी कणिक 
  • १ वाटी मिल्क पावडर 
  • १/२ वाटी तूप 
  • पाऊन वाटी पिठीसाखर
  • १ १/२ वाटी दुध 
  • १/४ चमचा सोडा व १/४ चमचा बेकिंग पावडर 
कृती :- 

  • कणीक, मिल्क पावडर व पिठीसाखर एकत्र करून घ्या. 
  • त्यात दुध व पातळ करून तूप घाला व सर्व मिश्रण चांगले फेटून घ्या.
     
  • त्यात बेकिंग पावडर व सोडा घाला. 
  • हे मिश्रण खूप घट्ट बनवू नये., थोडे सैल्सर असावे. 
  • आता एका मायक्रोव्हेव प्रुफ भांड्याला थोडे तूप लावून त्यात वरील मिश्रण ओता व १५-२० मि. "मिडीयम हाय" वर बेक करा. 
  • मायक्रोवेव ऐवजी ओव्हन मध्ये हीई १०-१५ मि. हा केक होतो.  
 

No comments:

Post a Comment