Wednesday, May 17, 2023

मार्बल केक


 


मार्बल केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • २५० ग्रॅम मैदा 
  • २५० ग्रॅम तूप/लोणी/मार्गारीन 
  • २५० ग्रॅम साखर 
  • २ चहाचे चमचे भरून बेकिंग पावडर 
  • १ चिमुट मीठ 
  • ५ अंडी 
  • १/४ कप दुध 
  • १.५ चमचा वॅॅनिला अर्क 
  • २ ते २.५ मोठे चमचे कोको पावडर 
कृती :- 

  • मैदा, बेकिंग पावडर, १ चिमुट मीठ एकत्र करणे आणि वरील मिश्रणात हळूहळू मिसळणे. नंतर थोडे दुध घालणे व मिश्रण एकजीव करणे. 
  • आता मिश्रणाचे २ भाग करून वेगवेळ्या वाडग्यात काढून घ्या. एका भागात कोको पावडर घाला व दुसरा भाग तसाच ठेवा.
     
  • केकच्या साच्याला तूप लावून घ्या. दोन चमचे कोकोयुक्त मिश्रण आणि २ चमचे वॅॅनिलाचे साधे मिश्रण संपेपर्यंत घाला. साचा तिरपा करून मिश्रण सगळीकडे सारखे पसरवून घ्या. 
  • अवन प्रीहीट करून घ्या. १८० ते २०० अंश से. ळा ३० ते ३५ मिनिटे बेक करा.  

No comments:

Post a Comment