Monday, May 8, 2023

बेसनाचं धिरडंं


 


साहित्य : 

  • एक वाटी बेसन 
  • अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा 
  • एक मोठा चमचा बारीक रवा 
  • अर्धी वाटी पाणी 
  • अर्धी वाटी ताक 
  • अर्धा चमचा लाल तिखट 
  • पाव चमचा ओवा 
  • चिमुटभर सोडा 
  • चवीनुसार मीठ 


कृती : 

  • धिरडे करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा. सर्व साहित्य एकजीव करून घ्याव्या. 
  • तवा तापला की नारळाची शेंडीने तव्याला तेल लावून घ्यावं. जेणे करून धिरड चिकटणार नाही. 
  • एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण ठेवावं. 
  • चर्र आवाज आला की धिरडे उलटाव. 
  • नीट उलटल गेलं आणि जरा जाड वाटल तर थोडं पाणी घाला. एकदा जमलं की तवाभर धिरड करता येत. 
  • अशा प्रकारे बेसनाचे धिरडे तयार होईल. 

No comments:

Post a Comment