Saturday, May 27, 2023

लसणीचे वरण


 

साहित्य :- 

  • १/२ कप तूरडाळ 
  • २ लसूण पाकळ्या 
  • ३ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • २ हिरव्या मिरच्या 
  • ३-४ कढीपत्ता 
  • फोडणीसाठी : - १ टीस्पून तेल, १/८ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद.
  • २ टीस्पून लिंबाचा रस 
  • मीठ 
कृती :- 

  • १/२ कप तूरडाळ स्वच्छ धुवून प्रेशर कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी. नंतर रवीने किंवा चमच्याने घोटून घ्यावे.
  • लसणीच्या पाकळ्या सोलून बारीक चिरून घ्याव्यात. मिरच्या उभ्या चिरून घ्याव्यात.
  • कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी.
     
  • चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या फोडणीत घालून १५ सेकंद परतावे. 
  • कोथिंबीर घालावी आणि ५-७ सेकंद परतून घोटलेली डाळ घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालावे. मीठ घालावे.
  • १-२ वेळा उकळी काढावी. लिंबाचा रस घालावा. 
  • हे लसणीचे वरण गरम गरम तूप-भाताबरोबर वाढावे. 

No comments:

Post a Comment