Saturday, May 20, 2023

पाइनॅॅपल फ्राईड राईस


 




साहित्य :- 

  • ३/४ कप बासमती तांदूळ 
  • १/२ चमचे + १ चमचा तेल 
  • १ चमचा किसलेले आले 
  • १-२ हिरव्या मिरच्या 
  • ३ पती कांदा बारीक चिरून 
  • १/२ कप अननसाचे बारीक तुकडे 
  • १ चमचा सोयासॉस 
  • १/२ वेजिटेबल स्टॉकची क्यूब (ऑप्शनल) वेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी.


कृती :- 

  • बासमती तांदूळ धुवून घ्यावा. एका पातेल्यात तांदुळाच्या दुप्पट ते सव्वा दोनपट पाणी गरम करत ठेवावे. 
  • त्यात उपलब्ध असल्यास वेजिटेबल स्टॉकची १/२ क्यूब घालावी. ती विरघळली कि तांदूळ घालावे. 
  • थोडे मीठ आणि १/२ चमचे तेल घालावे. भात मोकळा शिजवावा. 
  • शिजवलेला भात एका ताटात काढून थंड होवू द्यावा आणि भाताच्या ताटावर दुसरे ताट ठेवून हा भात थोडा वेळ (२० मिनिटे) फ्रीजमध्ये ठेवावा. म्हणजे भाताला चिकटपणा येणार नाही आणि अजून मोकळा होईल. 
  • नंतर कढईत १ चमचे तेल गरम करून त्यात १/२ चमचे किसलेले आले घालावे, उभ्या चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. 
  • पाती कांदा घालून अगदी १० सेकंद परतावे. सोयासॉस घालून लगेच भात घालावा. १-२ मिनिटे परतावे. गरजेनुसार मीठ घालावे. 
  • गॅॅस मंद करून त्यात अननसाचे तुकडे घालून मिनिटभर परतावे. उरलेले आले घालून मिक्स करावे. 
                  हा भात गरम गरम सर्व्ह करावा. 

 

No comments:

Post a Comment