Wednesday, May 17, 2023

पंजाबी मेथी पकोडा कढी




 
साहित्य :- 

- २०० ग्रॅॅम दही 

- १५० ग्रॅॅम बेसन 

- १-२ चमचा मेथीदाणा 

- चवीनुसार मीठ 

- तिखट 

- चिमुटभर हिंग 

- १-२ चमचा लाल मिरच्या 

- १/२ कप मेथी बारीक चिरलेली

- १ कांदा कापलेला 

- १/२ चमचा ओवा 

- तळण्यासाठी तेल. 

कृती :- 

- दोन मोठे चमचे बेसन वेगळे काढून बाकी बेसनाचा घोळ तयार करावा. 

- त्यात मीठ, तिखट, आलं-लसूण पेस्ट, कांदा, मेथी, ओवा मिसळावा. या घोळीचे भजी तळून वेगळे ठेवावे. 

- दह्याला चांगल्याप्रकारे फेटून त्यात बेसन, मीठ, हिरवी मिरची, हळद आणि २ कप पाणी टाकावे.

 

- २ मोठे चमचे तेल गरम करावे. हिंग, मेथीदाणा, साबूत लाल मिरच्या घालाव्या. 

- नंतर त्यात दह्याचा घोळ घालावा. उकळी आल्यावर भजी घालून काही वेळ शिजवावे. 

                पंजाबी मेथी पकोडा कढी तयार आहे. 




No comments:

Post a Comment