Wednesday, May 10, 2023

मनचाऊ सूप



 


साहित्य :- 

  • १ चमचा तेल 
  • ५ मोठ्या लसूण पाकळ्या, एकदम बारीक चिरून 
  • १ इंच आल्याचा तुकडा, सोलून बारीक चिरून 
  • १ ते २ हिरव्या मिरच्या 
  • १ कप भाज्या, एकदम बारीक चिरलेल्या - भोपळी मिरची, गाजर, मश्रुम, पती कांद्याचा पांढरा भाग 
  • ३ कप व्हेजिटेबल स्टॉक 
  • १ चमचा सोया सॉस 
  • १/२ चमचे व्हिनेगर 
  • १/२ टोमॅॅटो केचप 
  • १/२ मॅॅगी चिली मसाला सॉस १ चमचा कॉर्न फ्लोअर 
  • २ चिमटी व्हाईट पेपर पावडर 
  • चवीपुरते मीठ 
  • सजावटीसाठी पाती कांद्याचा हिरवा भाग 
  • १/४ कप शेवया.
 

कृती :- 

  • शेवया :- चायनीज नुडल्स पाण्यात उकळवून साधारण ८० ते ९०% शिजवून घ्याव्यात. शिजवलेल्या शेवयांपैकी अर्ध्या शेवया तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळाव्यात. 
  • कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण ४ ते ५ सेकंद परतावे. मिरची घालून परतावे. त्यावर चिरलेल्या भाज्या घालून अर्ध्या कच्चा शिजवाव्यात. मीठ घालावे. 
  • भाज्या अर्धवट शिजल्या कि ३ कप व्हेजिटेबल स्टॉक घालावा. एक उकळी आली कि १ चमचा सोया सॉस , टोमॅॅटो केचप आणि मॅॅगी चिली मसाला सॉस घालून उकळवावे. चव पहावी लागल्यास मीठ घालावे. व्हाईट पेपर पावडर घालावी. 
  • १ चमचा कॉर्न स्टार्च १/४ कप पाण्यात मिक्स करून सूपमध्ये घालावे. शेवया वापरणार असाल तर फक्त शिजवलेल्या शेवया घालाव्यात. 
      सर्व्ह करताना बाऊलमध्ये आधी सूप घालावे, त्यावर बारीक चिरलेला पाती कांद्याचा हिरवा भाग आणि तळलेल्या शेवया घालाव्यात. 
  

No comments:

Post a Comment