काकडीचा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
- २ वाट्या काकडीचा किस
- १ वाटी रवा
- १ वाटी गुळ
- ४ टीस्पून बेटर
- १ चमचा तूप
- १ लहान चमचा वेलची पूड
- बदामाचे काप
- काकडी सोलून किसून घ्यावी. दोन्ही हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे.
- रवा तुपावर भाजून घ्यावा. मध्यम आचेवर कढईत बेटर घालावे.
- त्यात रवा, गुळ आणि काकडीची किस घालून ढवळत राहावे.
- ५-१० मिनिटांत रवा, गुळ, काकडीचा किस यांचे मिश्रण मिळून येते. त्यात वेलची पूड घालावी.
- ओव्हन ३७५ F ला प्रीहीट करावे. बेकिंग ट्रेमध्ये तुपाचा हात लावावा.
- त्यात तयार मिश्रणाचा १ इंचाचा थर करावा. त्यावर बदामाचे काप घालावे.
- १५-१८ मिनिटे बेक करावे.
- केकच्या कडा थोड्या गोल्डन ब्राऊन झाल्या की केक तयार झाला असे समजावे.
- केक ट्रेमध्ये काढावा. सुरीने चौकोनी वड्या कराव्यात.
No comments:
Post a Comment