Thursday, May 25, 2023

पापलेटची आमटी


 


साहित्य :- 

  • दोन पापलेट 
  • दहा बेडगी मिरच्या 
  • पाच लसूण पाकळ्या 
  • तिन-चार आमसूल
  • एक चमचा धणे 
  • छोटा कांदा 
  • पाव चमचा हळद 
  • खोबरे, मीठ 
कृती :- 

  • पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.
  • भिजवलेले धणे व मिरची वाटून घ्या. नंतर हळद, धणे, लसूण, मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या.
  • तेलात तयार केलेले वाटण परतवा. नंतर थोडे पाणी घालून उकळी येवू द्या. 
  • त्यात पापलेटचे तुकडे हळुवार सोडा. थोडे मीठ घालून ८-१० मिनिटे शिजवा.
  • नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते. 
 

No comments:

Post a Comment