Monday, May 8, 2023

मसाला चहा


 
साहित्य : 

  • २ कप दूध 
  • १ कप पाणी 
  • २-३ चमचे साखर 
  • २ चमचे चहा पावडर 
  • १ चमचा चहाचा मसाला 
  • ३ तुकडे सुंठ 
  • १/२ जायफळ 
  • ४ दालचिनीचे तुकडे 
  • ८-१० काळीमिरी 
  • १० हिरवी वेलची 

कृती : 

  • सर्वात आधी आपण चहाचा मसाला बनवू. चहाचा मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात सुंठ, जायफळ, वेलची, काळी मिरी आणि दालचिनी हे सगळे मसाले घालून फिरवून घेऊ. 
  • वाटून झाल्यावर मसाल्याचा खूप मस्त छानसा सुगंध येतो. 
  • आता चहा बनवण्यासाठी आपण एका पातेल्यात दूध घेऊ. नंतर त्यात चाय पत्ती आणि साखर घालू. 
  • आता चहाला छान उकळी आल्यावर त्यात आपण बनवलेला चहाचा मसाला घालून आणि थोडा वेळ गॅॅस वर ठेवू आता चहा गाळून घेऊ. 
  • अशा प्रकारे सुगंधी गरमा गरम मसाला चहा तयार होईल. 

No comments:

Post a Comment