आज आपण धणे-जिरे कसाय या सरबताची रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य :-
- १०० ग्रॅम धणे
- ५० ग्रॅम जिरे
- २ कप दुध
- ८ चमचे साखर
- धणे व जिरे वेगवेगळे थोडेसे भाजून घ्यावेत.
- धणे-जिरे एकत्र करून मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यावी.
- ही दळलेली पूड कसाय करिता वापरावी.
- कसाय :
- एका भांड्यात २ कप पाणी व २ कप दुध घेऊन ते एकत्र करून गरम करावयास ठेवावे.
- त्यात ८ चमचे साखर घालावी व चार चमचे धणे-जिरे पूड घालून हे मिश्रण उकळी येईपर्यंत तापवावे.
- थंड अथवा गरम सर्व्ह करावे.

No comments:
Post a Comment