Wednesday, May 17, 2023

आंबा मोदक

 साहित्य :- 

  • १/२ कप हापूस आंब्याचा मावा
  • ३/४ कप साखर 
  • १/२ कप खवा 
  • १ चमचा तूप. 
कृती :- 

  • साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवावी. पिठीसाखर बारीक चाळणीतून चालून घ्यावी. चाळणीत राहिलेली जाडसर साखर खलबत्यात कुटून बारीक करावी. 
  • मायक्रोव्हसेफ भांडे घ्यावे. त्यात तूप आणि आंब्याचा मावा घालावा. दीड मिनिट मायक्रोबेव्ह करावे. भांडे बाहेर काढून ढवळावे. 
  • जरा निवळले कि परत १ मिनिट आणि नंतर ३० सेकंद असे मायक्रोवेव्ह करावे. मावा जळणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • भांडे बाहेर काढून ३० सेंकद ढवळा. आता खवा हाताने मोडून या माव्यात मिक्स करावा. ३०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. (प्रत्येक ३० सेकंदानी भांडे बाहेर काढून मिश्रण ढवळावे.) 
  • मिश्रण पातळसर वाटत असेल तर अजून २० ते ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. (मिश्रण बाहेर काढाल तेव्हा ते बुडबुडेयुक्त आणि थोडेसेच पातळ असेल. थोडावेळ चमच्याने ढवळले कि निवळून घट्टसर बनते. 
  • मिश्रण घट्ट आणि चिकट बनेल. अगदी कोमट झाले कि साखर घालून मिक्स करा. साखर मात्र एकावेळी थोडीथोडीच घालावी. 
  • मिश्रण मायक्रोवेव्ह बाहेर काढल्या काढल्या साखर घालू नये. साखर वितळून मिश्रण एकदम पातळ होते. 
  • मिश्रण घट्टसर झाले कि मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदक बनवावे.  

No comments:

Post a Comment