Sunday, May 14, 2023

फणस पापड


 

आज आपण फणस पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
 

साहित्य :- 

  • कच्च्या फणसाचे गरे 
  • मीठ 
  • हळद 
  • जिरे 
कृती :- 

  • कापा जातीच्या फणसाचा उपयोग फणसापासुन पापड तयार करण्यासाठी केला जातो. 
  • निरोगी कच्च्या फणसाचे गरे २० ते २५ मिनिटे चांगले उकडून घ्यावेत. उकडलेले गरे थंड करून मिक्सरमध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद व जिरे घालून एकजीव करून घ्यावेत.
     
  • प्लास्टिकच्या पेपरला तेल लावून प्लीच्या साह्याने हे मिश्रण प्लास्टिक पेपरवर पसरावे. नंतर पूर्णपणे वाळून झाल्यावर त्याचे काप करून हवाबंद डब्यात ठेवावेत. 
  • जेव्हा आपल्याला गरज असेल, तेव्हा तेलात तळून घ्यावेत.  

No comments:

Post a Comment