साहित्य :
- १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
- २ कप पाणी, १ चमचा तूप
- १/२ चमचे जिरे
- २ आमसूल, २-३ मिरच्या
- १ चमचा गूळ किंवा चवीनुसार साखर
- चवीपुरते मीठ, कोथिंबीर
कृती :
- प्रथम दाण्याचा कुट आणि पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
- पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरे आणि मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी.
- त्यामध्ये दाण्याच्या कुटाचे पाणी घालावे. आमसूल, मीठ आणि साखर घालावे.
- उकळी आल्यावर वरून कोथिंबीर घालवी.
- अशा प्रकारे शेंगदाण्याची आमटी तयार होईल.
.jpg)
No comments:
Post a Comment