Thursday, May 18, 2023

पार्लेजी बिस्कीट चॉकलेट केक


 

पार्लेजी बिस्कीट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

 

  • पार्लेजी बिस्किटे - १० रु. चा पुडा 
  • कोको पावडर - २ चमचे 
  • दुध - ११/२ कप 
  • साखर - १/२ वाटी 
  • इनो ( साधा ) - ५ रु. पाकीट 
कृती :- 

  • प्रथम मिक्सरच्या सहाय्याने बिस्किटांचा बारीक चुरा करून घ्या. 
  • त्या चुऱ्यामध्ये साखर आणि कोको पावडर घाला. नंतर दुध घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरबरीत भिजवा.
     
  • अल्युमिनियमच्या डब्याला सर्व बाजूने तूप लावून घ्या. गॅसवर लोखंडी तवा तापत ठेवा. 
  • वरील मिश्रण इनो घालून फेटून घ्या. मिश्रण फेटल्यानंतर ते डब्यामध्ये ओता. 
  • झाकण लावून दबा तव्यावर ठेवा. साधारण ३० मिनिटाने झाकन उघडून केक तपासून पहा. 

No comments:

Post a Comment