Tuesday, May 16, 2023

आलू बर्गर पॅॅटीज


 




साहित्य :- 

  • ३ मोठे बटाटे (उकडून सोलून मॅॅश केलेले) 
  • ३/४ कप मटार, वाफवलेले 
  • १ मध्यम गाजर, किसलेले 
  • २ चमचे लसूण पेस्ट 
  • १ चमचा हिरवी मिरची पेस्ट 
  • १/२ चमचे आलं (ऐच्छिक)
  • १/२ चमचा गरम मसाला 
  • १/४ कप ब्रेड क्रम्ज
  • २ चमचे तेल 
  • चवीपुरते मीठ 
  • अजून थोडे तेल/ बटर पॅॅटीज रोस्ट करण्यासाठी.  


 
कृती :- 

  • कढईत तेल गरम करावे. आले-लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट घालावी. काही सेकंद परतावे. 
  • मटार आणि गाजर घालून १-२ मिनिटे मंद आचेवर वाफ काढावी. बटाटे, ब्रेड क्रम्ज आणि मीठ घालून मिक्स करावे. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफवावे. 
  • शेवटी गरम मसाला घालून मिक्स करावे. 
  • मिश्रण थंड होवू द्यावे. मिश्रणाचे ८ समान भाग करावे. त्याच्या चपट्या पॅॅटीज बनवाव्यात. नॉनस्टीक तव्यावर थोडे तेल घालून कमी आचेवर भाजाव्यात. आच मंद असावी. दोन्ही बाजू लालसर आणि थोड्या कुरकुरीत करून घ्याव्यात. 
  • हा पॅॅटीज वापरून बर्गर बनवू शकतो. तसेच या पॅॅटीज नुसत्या खायलाही छान लागतात. त्याचबरोबर टोमॅॅटो केचप किंवा हिरवी चटणी सर्व्ह करावी.  

No comments:

Post a Comment